मुंबई : प्लास्टिकबंदीला कसा प्रतिसाद? थेट नागरिकांशी संवाद

राज्यात आजपासून (23 जून) प्लास्टिक बंद होणार आहे. राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीत काल पार पडलेल्या आढावा बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यामुळे आजपासून तुम्ही प्लास्टिक वापरल्यास पाच हजार रुपयांचा दंड बसणार आहे. मात्र कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे व्यापाऱ्यांबरोबरच सर्वसामान्यांकडून या निर्णयावर टीकाही होत आहे.