महाराष्ट्र बंद : राज्यातील परिस्थिती काय?

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा मोर्चानं पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. आज राज्यभरातील शाळा, एसटी बसेस, बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसंच अफवा पसरवून मराठा बंदचा गैरफायदा घेणाऱ्यांना आळा घालण्यासाठी पुणे, सांगली, सातारा, औरंगाबादसह अनेक जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहेत. दरम्यान अनेक ठिकाणी बंद पाळून काही ठिकाणी ठिय्या करुन मराठा आरक्षणासाठी आज मराठा मोर्चानं आंदोलन केलं.
दरम्यान बंदच्या दरम्यान हिंसक आंदोलन करु नये, शांतता आणि शिस्त कायम ठेवावी, असं आवाहनही मराठा मोर्चानं आंदोलकांना केलंय.